Monday, April 29, 2024
HomeUncategorizedस्त्री-पुरुष विषमतेची दरी ज्ञानानेच संपवणे शक्य-डॉ. आरतीश्यामल जोशी 

स्त्री-पुरुष विषमतेची दरी ज्ञानानेच संपवणे शक्य-डॉ. आरतीश्यामल जोशी 

औरंगाबाद – aurangabad

स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सृदढ, समान करण्यासाठी महिलांनाच आपल्या हक्कांबद्दल जागरूक होणे गरजेचे आहे. तिला तिच्या क्षमता, पात्रता समाजासमोर आणाव्या लागतील. तरच तिला योग्य सन्मान मिळतो. न्याय हक्कांने जगता येते. यासाठी शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पत्रकार डॉ.आरतीश्यामल जोशी यांनी केले.

- Advertisement -

श्री संत सावता माळी (Sri Sant Savata Mali) ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री अंतर्गत गुणवत्ता निर्धारण केंद्र यांच्या वतीने क्षमता सुदृढी करण व स्त्री-पुरुष समानता उपक्रमांतर्गत श्री सन्मान आणि वांड्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार (journalist) डॉ.आरतीश्यामल जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. आर. टकले उपस्थित होते.

 डॉ.आरतीश्यामल म्हणाल्या की, स्त्री-पुरुष दोघेही समाजातूनच घडतात परंतु त्यांच्या घडवण्याच्या प्रक्रिया वेगळ्या असतात. पुरुष कर्ता, अर्थाजन करणारा संरक्षक तर स्त्री कुटुंब सांभाळणारी, परावलंबी अशी जडणघडण होत असते. हे घडत असताना स्त्रिया मागे पडतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ज्ञानाला एका चौकटीची मर्यादा येते आणि ती चौकट जेंव्हा भेदली जाईल, तेव्हाच स्त्री-पुरुष यांच्यामधील दरी संपुष्टात येईल. त्यामुळे स्त्रियांनी ज्ञान संपादन करून शिक्षणाकडे डोळसपणे पाहणे महत्त्वाचे ठरेल. माध्यमांचा वापर ज्ञानी होण्यासाठी करावा. हे सांगताना त्यांनी वाचन संस्कृतीवर भाष्य केले. तर मोबाइलचे दुष्परिणाम सांगितले. वाचनाने नाविन्यपूर्ण दृष्टी लाभते यासाठी विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे. स्त्रियांना स्वतःचा विकास साधायचा असेल तर त्यांनी दर्जेदार वाचनासह, रेडिओ ऐकणे, बातम्या बघणे गरजेचे आहे. प्रत्येक माणूस अनुभवाची खाण आहे माणूस म्हणून जितकं माणसांना समजून घेता, तितके आपण समृद्ध होत जात असतो. समाजातील बदलांकडे स्त्रियांनी डोळस वृत्तीने पहावे, असे मत ही त्यांनी मांडले.

वांड्मय मंडळ सदस्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाचनीय पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजी विभागाचे प्रमुख, डॉ. अश्विन रांजणीकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी मानले. यावेळी मराठी विभागाच्या प्रमुख, डॉ. राजश्री पवार, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय येडले, प्रा. डॉ. सुरेश मुंढे, रमेश जगधने, रत्नाकर जाधव, विनोद तुपे यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या