Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसावधान... चौथी लाट जूनमध्ये येण्याची शक्यता!

सावधान… चौथी लाट जूनमध्ये येण्याची शक्यता!

औरंगाबाद – aurangabad

मागील काही दिवसांपासून पुन्हा (South Korea) दक्षिण कोरीया, चीनसह काही देशांमध्ये (corona) कोरोनाचे रुग्ण बाढताना दिसत आहेत. या आकडेवारीचा अभ्यास करुन शहरात (Municipal Corporation) महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने (Health system) पूर्वतयारी सुरु केली आहे. साधारणत: जून महिन्याच्या अखेरीस (India) भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात कोरोना लसीकरणावर भर दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात तिस-या लाटेसाठी विविध उपायोजनांची तयारी महापालिका व जिल्हा प्रशासनाने (District Administration) केली होती. मात्र तिसर्‍या लाटेसंबंधी वर्तवण्यात आलेले सर्व अंदाज फोल ठरले. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका बर्तवण्यात आला होता. मात्र जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान आलेल्या तिसर्‍या लाटेत शून्य ते अठरा वयोगटातील केवळ १२३० मुले कोरोनाबाधित झाली. त्यातही ही सर्व मुले नॉर्मल बाधित झालेली होती. तसेच पहिल्या व दुस-या लाटेपेक्षा तिसरी लाट लगेच ओसरली. त्यातही रुग्ण संख्या अगदी नगण्य होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी अद्यापही कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ चालवली आहे.

शहरातील (Vaccination) लसीकरणाचे टारगेट १० लाख ५५ हजार एवढे आहे. त्यात आजवर ८७ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर फक्त ६२ टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतलेला आहे. विशेष म्हणजे, दीड लाखापेक्षा अधिक नागरिकांची दुसरा डोस घेण्याची तारीख देखील निघुन गेली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेच्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य विभागाने विविध विभागांशी पत्रव्यवहार करत आयएमए, पोलीस प्रशासन, महाविद्यालये, उद्योग, खासगी संस्था यांना स्मरणपत्रे देऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर अधिक जोर देण्याची सूचना केली आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा (Task Force) टास्क फोर्सच्या बैठकीत चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. शहरातील ऑक्सीजन बेडची व्यवस्था, कोविड केअर सेंटर्स आणि इतर आरोग्य सुविधा सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. तिस-या लाटेत लसीकरणामुळे रुग्ण गंभीर झाले नाहीत. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डोसवर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे दुसरा डोस न घेतलेल्यांच्या घरी जाऊन त्यांना डोस देण्याची मोहीम पालिकेने सुरू देखील केलेली आहे.

लहान मुलांचे लसीकरण आवश्यक

लहान मुलांच्या लसीकरणात महापालिका अजूनही मागेच आहे. शहरात १५ ते १८ वयोगटातील ६९ हजार आणि १२ ते १४ वयोगटातील ५६ हजार मुलांचे लसीकरण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. मात्र यात महापालिकेला केवळ १८% पर्यंत लसीकरण करण्यात यश आले आहे. चौथ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक मानले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या