कोरोना रुग्णांसाठी शहरात पहिली प्लाझ्मा बँक

८५ दात्यांची नोंदणी, सेवा फाऊंडेशनचा 'माणुसकी' उपक्रम
कोरोना रुग्णांसाठी शहरात पहिली प्लाझ्मा बँक

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना रूग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा हे जीवनदान. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा रूग्णाच्या शरीरात सोडल्यास त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढून विषाणुविरूद्ध लढण्यास ताकत मिळते. यामुळेच शहरातील पहिली "प्लाझ्मा बँक' तयार करण्यासाठी औरंगाबादच्या सेवा फाऊंडेशनने "माणुसकी' उपक्रम सुरू केलाय. प्लाझ्मा दाते आणि गरजू यांच्यातील दुवा म्हणून फाऊंडेशन काम करत आहे. आठवडाभरात बँकेसाठी ८५ दात्यांनी नोंदणी केली आहे.

Title Name
घराबाहेर न पडणार्‍या महिला सुरक्षित; पुरूषच जास्त बाधित !
कोरोना रुग्णांसाठी शहरात पहिली प्लाझ्मा बँक

कोरोनावरील उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी लाभदायक ठरते. रक्तातील तांबड्या पेशी वगळून उर्वरित रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा रूग्णाच्या शरीरात टाकला जातो. यामुळे रूग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज वाढून रोग प्रतिकारशक्ती वाढते. विषाणूची तीव्रता कमी होते. योग्य वेळी प्लाझ्मा मिळाल्यास रूग्णाचा जीव वाचू शकतो. ही बाब लक्षात घेवून फाऊंडेशनने "माणुसकी' उपक्रमाअंतर्गत पहिली "प्लाझ्मा बँक' सुरू केली आहे.

"माणुसकीला प्रतिसाद

प्लाझ्मा दात्यांची नोंदणी आणि संमतीसाठी सेवा फाऊंडेशनने एक गुगल फॉर्म तयार केला आहे. त्याची लिंक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तर गरजूंना संपर्कासाठीही फाऊंडेशनने अनेक नंबर व्हायरल केले आहेत. त्यावर गरजू मागणी नोंदवतात. बँकेतील दात्याचा रक्तगट जुळून आल्यास फाऊंडेशन दाते आणि गरजूंची भेट घालून देतात. पुढील प्रक्रिया संबंधीत रूग्णालये पार पाडतात. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यात ८५ दात्यांनी नोंद केली आहे.

...तरच प्लाझ्मा दान शक्य

५५ किलोपेक्षा अधिक वजन, १८ ते ६० वयोगट आणि कोरोनातून बरे होवून २८ दिवस पूर्ण झालेली व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. प्लाझ्मा देण्यापूर्वी रूग्णालयात काही चाचण्या घेतल्या जातात. ही अत्यंत सुरक्षित व सोपी पध्दत असून त्यामुळे एक जीव वाचू शकतो.

दिल्लीहून आली मागणी

दिल्लीतील विनीत पाठक यांनी एका ५५ वर्षीय रूग्णासाठी एबी पॉझीटीव्ह प्लाझ्माची मागणी नोंदवली. प्लाझ्मा घेण्यासाठी ते विमानाने येण्या-जाण्याच्या तयारीत होते. शहरात सर्व तयारी झाली असतांना पाठक यांना दिल्लीतच प्लाझ्मा मिळाला. त्यांनी फाऊंडेशनचे आभार मानले.

गरजूंनो संपर्क साधा

प्न्लाझ्माची गरज असणाऱ्यांनी ९७६४७७३७७७, ८०८७४४७८२०, ९३७०६९०७१७, ९३०७६५५५३४, ९५९५२४०००९ वर संपर्क साधावा. दात्यांना फाऊंडेशनच्यावतीने जीवनदाता प्रमाणपत्र देवून गौरविले जाणार आहे.

आम्ही फक्त माध्यम

अनेक रूग्णांना प्लाझ्माची गरज आहे. तर अनेकांना प्लाझ्मा दान करायचा आहे. मात्र, माहिती अभावी दोघांची अडचण होते. ती दूर करण्यासाठी आम्ही गरजू आणि दानशूर यांच्यातील फक्त माध्यम आहोत. डॉक्टरांमार्फत दोघांची भेट घालून देण्याचे काम करतोय. उपक्रमाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून याची गरज लक्षात येते. -शुभम लोहाडे, समन्वयक, सेवा फाऊंडेशन

Title Name
आता अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी लगद्याच्या विटांचा वापर
कोरोना रुग्णांसाठी शहरात पहिली प्लाझ्मा बँक
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com