औरंगाबादेतील 60 हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

115 वॉर्डांत लसीकरणाची जम्बो मोहीम
औरंगाबादेतील 60 हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने सर्व 115 वॉर्डांत कोरोना लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शासन निर्देशांन्वये 45 वर्षांवरील सर्व प्रकारच्या नागरिकांना कोरोला लस दिली जात आहे. त्यामुळे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांतच 45 ते 59 वर्षांवरील सुमारे 60 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरीकडे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकडून मात्र या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारने देशात कोरोना संसर्गाची लाट रोखण्यासाठी संशोधनाअंती कोरोना लस नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. त्यानुसार 16 जानेवारीपासून औरंगाबाद शहरातही कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आजवर पहिल्या टप्यात डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात आली.

Title Name
औरंगाबाद शहरात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये लक्षणीय घट
औरंगाबादेतील 60 हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

दुसर्‍या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर व तिसर्‍या टप्यात ज्यांचे वय 45 पेक्षा जास्त आहे अशा गंभीर आजारी व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. यातच 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे पालिकेने 5 एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सोबतच व्यापारी, बँक कर्मचारी, कामगारांना लसीकरण केले जात आहे.

Title Name
रेमडेसिविरनंतर आता टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा!
औरंगाबादेतील 60 हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

पालिकेसह शासकीय 121 व खासगी 28 अशा 149 लसीकरण केंद्रांतंर्गत ही मोहीम राबवली जात आहे. मागील पंधरा दिवसांत या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार 45 ते 59 वर्षांवरील 59,295 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा आधीपासूनच लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र तरी देखील 49 हजार 761 ज्येष्ठांनीच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

Title Name
होम आयसोलेशनचे ६० रुग्ण रुग्णालयात दाखल 
औरंगाबादेतील 60 हजार नागरिकांनी घेतला पहिला डोस

मागील काही दिवसांपासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या जम्बो लसीकर मोहीम संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी लसी संपल्यामुळे बुधवारची मोहीम बारगळण्याच्या मार्गावर होती. दरम्यान, 15 हजार लसी प्राप्त झाल्याने संकट टळले. मात्र हा पुरवठा दोनच दिवस पुरणार आहे. त्यानंतर लस वेळेवर प्राप्त झाल्या नाहीत तर ज्या नागरिकांची दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यात अडचण येणार आहे.

आजवर झालेले लसीकरण

आरोग्य कर्मचारी : पहिला डोस : 26,910/दुसरा डोस : 11,349

फ्रंटलाइन वर्कर्स : पहिला डोस : 26,260/दुसरा डोस : 4,593

45 ते 59 वयोगट : पहिला डोस : 59,295/ दुसरा डोस : 3,456

60 वर्षांवरील ज्येष्ठ : पहिला डोस : 49,761/ दुसरा डोस : 6,733

एकूण लसीकरण : 1,88,356

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com