औरंगाबादमध्ये राबवली जातेय 'व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना

औरंगाबादमध्ये राबवली जातेय 'व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना

सौंदर्यात भर पडणार 

औरंगाबाद - aurangabad

शहरातील प्रदुषणाचे प्रमाण कमी व्हावे आणि पर्यावरणाचे संतुलन (balance) राखले जावे, यासाठी महापालिकेतर्फे (Municipal Corporation) ठिकठिकाणी व्हर्टिकल गार्डन (Vertical garden) तयार करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. या गार्डनमुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत मिळेलच; त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे मानले जात आहे.

औरंगाबादमध्ये राबवली जातेय 'व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना
या प्राणिसंग्रहालयाचे लवकरच स्थलांतर
औरंगाबादमध्ये राबवली जातेय 'व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना
उद्यापासून भरणार शिक्षकांची शाळा

प्रदूषण नियंत्रण (Pollution control) आणि पर्यावरण संतुलनासाठी सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेतर्फे विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जात आहे. प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरणाचा प्रयत्न केला जात आहे, तर काही प्रमुख रस्त्यांच्या दोन्हीही बाजूनी दाट झाडी लाऊन ग्रीनबेल्ट विकसीत करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. आता त्यात व्हर्टिकल गार्डनची भर पडणार आहे.

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या ३५ कोटी रुपयांच्या निधीमधून व्हर्टिकल गार्डनच्या कामासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या योजनेचा लाभही घेतला जात आहे. पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्हर्टिकल गार्डनचे काम केले जात असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे उपअभियंता गोपीकिशन चांडक यांनी दिली.

शहरातील सर्वच उड्डाणपुलांच्या भिंतींवर व्हर्टिकल गार्डन तयार केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नाल्यांच्या पुलावर जाळ्या लावून त्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार केले जाणार आहे. या कामाची सुरुवात महावीर चौक येथील उड्डाणपुलापासून करण्यात आली आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाच्या भिंतीला जाळी लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यावर येत्या महिना-पंधरा दिवसांत झाडांच्या कुंड्या लावल्या जाणार आहेत. त्याशिवाय सारस्वत बँकेसमोरील नागेश्वरवाडीच्या नाल्याच्या पुलावर, औरंगपुरा भाजी मंडईच्या नाल्याच्या पुलावरही व्हर्टिकल गार्डनसाठी काम सुरू करण्यात आले आहे. महिनाभरात या तिन्हीही ठिकाणच्या सौंदर्यात भर पडेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com