एकदाच करा चार्ज; १६०० किमी नॉनस्टाॅप धावणार 'ही' कार

एकदाच करा चार्ज; १६०० किमी नॉनस्टाॅप धावणार 'ही' कार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतात इलेक्ट्रिक कार्सचा (Electric cars) मोठ्या प्रमाणात प्रचार (Publicity) केला जात आहे. कारण या गाड्यांमुळे प्रदूषण होत नाही आणि त्यांचा मेंटेनन्सदेखील (maintenance) कमी आहे. जगातील सर्व देश सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक कारवर काम करत आहेत. ज्या सिंगल चार्जमध्ये (Single charge) लांब पल्ल्यासाठी (Long range) वापरल्या जाऊ शकतात...

या कारला चार्ज करावे लागत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत (Emergency) आपण कार वापरू शकत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही कंपन्या सौरऊर्जेद्वारे ( Solar Energy) चालविल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक कार तयार करीत आहेत...

ज्या केवळ सूर्यप्रकाशानेच चार्ज होऊ शकतात. म्हणजे आपल्याला त्यामध्ये प्लग इन करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन गाड्यांविषयी सांगणार आहोत ज्यांना सूर्यप्रकाशाने चार्ज केले जाऊ शकते.

Aptera Paradigm

Aptera Motors Corp. ही पहिली कंपनी आहे जिने आपली सौर उर्जेवर (Solar Energy) चालणारी इलेक्ट्रिक कार (Electric car) तयार केली आहे, जिचे नाव Aptera Paradigm आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ही कार खूप वेगवान आहे.

या कारला शून्यापासून १०० किमी वेगापर्यंत (Speed) पोहोचण्यासाठी केवळ ३.५ सेकंदांचा कालावधी लागतो. या कारची बॅटरी २५ किलोवॅट (Kilowatts) ते १०० किलोवॅटपर्यंत (Kilowatts) आहे. ही इलेक्ट्रिक कार वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये 134 बीएचपी (BHP) ते 201 बीएचपीपर्यंत (BHP) उर्जा निर्मिती करू शकते.

ही तीन चाकी इलेक्ट्रिक कार आहे ज्याची रचना स्पेसशिपसारखी (Spaceship) असल्याने जगभरातील सर्व कार्सपेक्षा वेगळी दिसते. या कारला सूर्यप्रकाशाने चार्ज केले जाऊ शकते कारण या कारवर सोलर पॅनल (Solar panels) बसविण्यात आले आहे.

केवळ सिंगल चार्जवर (Single charge) ही कार साधारणतः १ हजार ते १ हजार ६०० किमीपर्यंत प्रवास करू शकते. या कारसाठी कंपनीने प्री-ऑर्डर (Pre-order) विक्री सुरू केली होती ज्यात 24 तासांपेक्षा कमी वेळात ही कार विकली गेली.

Humble One

कॅलिफोर्नियास्थित स्टार्ट-अप कंपनी हम्बल मोटर्सने (Humble Motors) SUV Humble One ची रचना तयार केली आणि ती जगासमोर सादर केली. ही कारदेखील सौरऊर्जेवर चालते.

या कारमध्ये बॅटरी चार्ज करण्यासाठी सोलर रूफ (Solar roof), इलेक्ट्रिसिटी जेनरेटिंग साइड लाइट्स (Electricity generating side lights), पियर टू पियर चार्जिंग (Peer to peer charging), री-जेनरेटिव ब्रेकिंग (Regenerative braking) देण्यात आले आहे. या सर्वांच्या मदतीने एसयूव्हीची (SUV) बॅटरी (Battery) सहज चार्ज होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com