तीन लाखाचे दागिने घेऊन नववधू फरार

लग्नाच्या पाचव्याच दिवशी दिला धोका
तीन लाखाचे दागिने घेऊन नववधू फरार

औरंगाबाद - aurangabad

पाच दिवसांपूर्वी थाटामाटात लग्न सोहळा (Wedding ceremony) पार पडला. त्यानंतर तीन दिवसांनंतर सत्यनारायणाचा (Satyanarayana) कार्यक्रमही पार पडला. पण लग्नाच्या पाचव्या दिवशी (Daulatabad Fort) दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी जोडपे गेलं आणि पतीला किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढेतोपर्यंत मी काहीतरी खाद्यपदार्थ आणते सांगून नववधू तीन लाखांवरील दागिने (Jewelry) घेऊन पसार झाली. तर खुलताबाद (Khultabad) तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे (२६) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून शुभांगी शिंदे असे फसवणूक करणाऱ्या नववधूचं नाव आहे.

राजेशचा २६ मार्च रोजी शुभांगी शिंदे या तरुणीसोबत मावसाळा इथे थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर तीन दिवसांनंतर सत्यनारायणाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेव राजेश आणि नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. किल्ल्यावर पोहचल्यावर शुभांगीने राजेशला 'तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढा, मी काही खाण्याचे पदार्थ खरेदी करते, असे सांगितले.

यामुळे राजेश तिकीट काढण्यासाठी गेला, पण बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेव्हा तेथील काही दुकानदारांना विचारपूस केली असता, शुभांगी एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. विशेष म्हणजे १८ हजारांची मण्यांची सोन्याची पोत, ८,५०० रुपयांचे दीड ग्रॅमचे मंगळसूत्र, ८ हजारांचे कानातले, ४ हजार ७०० रुपयांची पायातील चांदीची चेन आदी मुद्देमाल घेऊन शुभांगीने पोबारा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com