वैविध्यपूर्ण विषयांमुळे पुस्तक वाचनीय

डॉ. वाकोडकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन
डॉ.अशोक वाकोडकर लिखित 'मागे वळून पाहता'चे प्रकाशन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय कुलकर्णी.
डॉ.अशोक वाकोडकर लिखित 'मागे वळून पाहता'चे प्रकाशन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय कुलकर्णी.

औरंगाबाद- Aurangabad

डॉ.अशोक वाकोडकर (Dr. Ashok Wakodkar) लिखित 'मागे वळून पाहता' या संकलन ग्रंथाचे प्रकाशन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजय कुलकर्णी (Judge Vijay Kulkarni) यांच्या हस्ते झाले. यावेळी कुटुंब न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश आय. जे. नंदा (Chief Justice I. J. Nanda), उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर (Deputy Collector Anjali Dhanorkar), भरोसा सेल प्रमुख आम्रपाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुस्तकात (Book) विविध विषय हाताळले असल्याने पुस्तक (Book) एकांगी होत नाही हे पुस्तकाचे (Book) सामर्थ्य आहे, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

डॉ. वाकोडकर (Dr. Wakodkar) यांनी प्रारंभी पुस्तक (Book) लिहण्यामागची प्रेरणा व यानिमित्ताने आलेल्या अनुभवांबद्दल उपस्थितांना सांगितले. आज समाजात नीतिमत्ता, संयम, संवाद हरवलेला दिसतो. त्यामुळेच प्रत्येक खासगी बाब ही न्यायालयापर्यंत पोहचवून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेस वाकोडकरांसारख्या अनुभवी समुपदेशक व्यक्तीची मदत समाजास होते. त्यामुळे त्यांनी पुस्तकात लिहिलेले अनुभव मोलाचे आहेत, असे मत न्यायाधीश विजय कुलकर्णी (Judge Vijay Kulkarni) यांनी व्यक्त केले. न्यायाधीश नंदा (Judge Nanda) यांनी यावेळी विवेकानंदांची कविता सादर करत वाकोडकरांच्या पुस्तकावर भाष्य केले. तर आम्रपाली तायडे यांनी हे पुस्तक नीतिमत्तेचे धडे देते, असे नमूद केले.

वाकोडकरांना संवादाचा उत्तम अनुभव असल्याने त्यांनी पुस्तकात मांडलेली प्रत्येक मुलाखत वाचकांच्या मनात घर करते. अमिताब बच्चन ते डाकू पंचमसिंहपर्यंत घेण्यात आलेल्या मुलाखती मानवी जीवन संपन्न करतात, असे धानोरकर म्हणाल्या. सूत्रसंचलन दीपाली कुलकर्णी यांनी तर आभार साधू यांनी मानले.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून जलसंपदा विभागात अभियंतापदी रूजू झाल्याबद्दल शिवम वाकोडकर यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'मागे वळून पाहता' हे पुस्तक विश्वसंकेत प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

रोटरी औरंगाबाद इलाईटचे पीडीजी सुहास वैद्य यांची रोटरी फाऊंडेशनच्या चेअरमन म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर कोर्ट मॅनेजर कोचर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनुजा वाकोडकर यांनी केले. मोहन कुलकर्णी, विजय रणदिवे, प्रार्चाय जब्दे, सुनिल वाकोडकर, जयश्री काळे, उद्धव भयवाल, सुधीर सेवेकर यांच्यासह शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com