दिलासादायक... टोमॅटो, मिरचीचे भाव आवाक्यात 

संततधारेमुळे भाज्यांची आवक घटली 
दिलासादायक... टोमॅटो, मिरचीचे भाव आवाक्यात 

औरंगाबाद - aurangabad

सततच्या पावसामुळे जाधववाडी बाजार समिती (Market Committee) आवारात भाजीपाल्याची आवक सर्वसाधारण असून (Tomatoes, green chillies) टोमॅटो, हिरवी मिरचीसह पालेभाज्याचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. सिमला मिरचीसह वांगी, भाव गेल्या १२ ते १४ दिवसांच्या तुलनेत वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजार समिती आवारात रोज परराज्यासह स्थानिक तसेच शेजारी जिल्ह्यातून फळे व भाजीपाल्याची आवक होत असते. सततच्या पावसामुळे आवक काहीशी मंदावल्याचे चित्र असून काही मालात चांगलाच चढ-उतार पाहण्यास मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या १२ दिवसांत कांद्याचे भाव बर्‍यापैकी स्थिर असले तरी, लसणाचे भाव मात्र किलोमागे १० ते १५ रुपयांनी वधारले आहे. १५ ते २० रुपये किलो या दराने कांद्याची विक्री होत लसणाचे दर ५० ते ६० रुपये झाले आहेत. गावरान लसणानेही भाव खाण्यास सुरुवात केली असून प्रत किलोचा दर शंभरीच्या घरात विक्रेते नरहरी येवलेकर यांनी सांगितले. भेंडीच्या दरात काहीशी वाढ झाली असून ६० ते ८० रुपये प्रती किलो असा सध्याचा दर आहे, अशी माहिती भाजीपाला विक्रेते संगीता जाधव यांनी दिली. वांग्याचे दरही वधारले ६० ते ८० रुपये प्रती किलो दर आहेत. दरम्यान, सिमला मिरची, दोडक्याने ही भाव खाण्यास सुरुवात केल आहे. त्यांचा प्रती किलो अनुक्रमे भावहा ६० ते ८० रुपये व ९० रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले. यासह फ्लॉवर ५० ते ६० रुपये, कोबी ५० रुपये, कोरले ६० ते ८० रुपये, शेवगा शेगा तसेच चवळी शेंगा ५७ ते ६० रुपये, काकडी ३० ते ४० रुपये, गाजर ६० ते ७० रुपये, दुधी भोपळा ४७ ते ५० रुपये प्रती किलो असे सरासरी दर आहेत.

नेहमी भाव खाणाऱ्या हिरवी मिरचीचा तोरा चांगला कमी झाला २० ते ३० प्रती किलो दराने त्यचे विक्री होत आहे. टोमॅटोचे दरही घसरले असून २० ते ३० रुपये प्रती किलोने त्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मेथोसह अन्य भाजीपाल्याची आवक कमी अधिक असल्याने त्याप्रमाणे दरात चढ उतार पाहण्यास मिळतो. सध्या मेथीची एक जुडी १० ते १५ रुपये, लक, शेपूची एक जुडी १० रुपयांना तसेच कोथिंबिरीची जुडीची विक्री ८ ते १० रुपयांना होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com