Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedप्रशासन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या पाठीशी

प्रशासन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या पाठीशी

औरंगाबाद – aurangabad

आत्महत्यग्रस्त कुंटुबियांना (Suicidal family) शासन विविध प्रकाराची मदत करत असते, कुंटुबप्रमुखांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना रोजगार, शिक्षण अशा विविध प्रकाराच्या मदतीतून आत्महत्याग्रस्त शेतकरी (Farmers) कुंटबियांना उभारी देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असत्याची ग्वाही (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. कन्नड (Kannada) येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियांना विविध उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसिलदार मोनाली सोनवणे यांच्यासह तहसील कार्यालय व विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाच कुंटुबियाना प्रत्येकी 2 शेळी, तीन कुंटुबियाना प्रत्येकी 1 शिलाई मशीन, पाच कुंटुबियाना प्रत्येकी 1 गॅस जोडणी, तीन कुंटुबियाना प्रत्येकी 1 पीठाची गिरणी, 60 सायकल तसेच चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियांना प्रत्येकी 01 लाखाची मदत तसेच राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य योजनेत अंतर्गत 27 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयाची मदत जिल्हा प्रशासना मार्फत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबातील सदस्यांना सर्वोतपरी मदत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पाल्यांना शिक्षण आणि महिलांना रोजगार उपलब्धतेसाठी विविध साहित्यांचे वाटप करण्यामध्ये प्रशासनप्रमाणेच विविध सामाजिक संस्थांनी मोलाच सहाकार्य केलं आहे. अश्या कुंटुबियांच्या मनात विश्वास आणि उभारी निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या