ठाकरे-राव भेटीने काही साध्य होणार नाही ; फडणवीसांचा घणाघात

ठाकरे-राव भेटीने काही साध्य होणार नाही ; फडणवीसांचा घणाघात

औरंगाबाद - aurangabad

(Telangana) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chief Minister K. Chandrasekhar Rao) यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी (Modi) विरोधक एकत्र आल्याच्या बातम्या झळकल्या खऱ्या पण असल्या भेटींनी आघाडी वगैरे काही होत नसल्याची फटकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावली.

फडणवीस हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून ते म्हणाले की, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भेट घेणं हे काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्रीदेखील मला भेटले होते. त्यामुळे मला यात काही फार महत्त्वाचे वाटत नाही. तसेच हे सर्व मंडळी मागच्या (Lok Sabha elections) लोकसभा निवडणुकीत सुद्धा एकमेकांचे हात पकडून मोठी आघाडी तयार केली. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयोग करून पाहिला, देशाच्या विविध राज्यात सुद्धा हा प्रयोग करून पाहिला पण कुठेही याचा परिणाम झाला नाही, असेही फडणवीस म्हणाले.

तेलंगणामध्ये टीआरएसची अशी परिस्थिती आहे की, मागच्या लोकसभेत भाजपच्या चार जागा निवडून आल्या असून पुढच्या वेळी तलंगणामध्ये (bjp) भाजप एक नंबरचा पक्ष राहील असेही फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com