Monday, April 29, 2024
HomeUncategorizedमराठवाड्यात तापमान चाळीशीपार!

मराठवाड्यात तापमान चाळीशीपार!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

यंदा उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव घेतल्यानंतर आता सूर्य (sun) पुन्हा एकदा मराठवाड्यावर कोपला असून विभागातील आठही जिल्ह्यांच्या तापमानाने (temperature) बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशी सलग चार दिवस चाळीशीपार केली आहे. विभागात सर्वाधिक परभणी ४३.६ अंश सेल्सिअस तर नांदेड शहराचे तापमान ४२.८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.

- Advertisement -

आता एका क्लिकवर पहा धरणातील पाणीसाठी

मार्चनंतर एप्रिल महिन्यातही मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले, मे महिन्यात विभागामध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी आता वातावरणात अचानक बदल झाला असून गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी लातूर आणि धाराशिव वगळता सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान चाळिशीच्या पार होते. यामध्ये सर्वाधिक परभणी शहर तापले असून नांदेड शहराचे कमाल तापमान ४२.८ अंश सेल्सियस होते. बीड शहराचे कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस तर हिंगोली ४२, छत्रपती संभाजीनगर ४१.४, जालना ४१.४, लातूर (उदगीर) शहराचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मराठवाड्यात अधूनमधून अवकाळी पाऊस होत असताना तीन दिवसांपासून शहरवासीयांना दमट वातावरणाचा सामना करावा लागत होता. त्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सलग तीन दिवस शहरे कडकडीत उन्हामुळे होरपळून निघाली.

उन्हाने लाही-लाही होऊन घामांच्या धारा अशी काहीशी अवस्था मराठवाड्यातील शहरांची झाली. साधारणपणे एप्रिल तसेच मे महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र स्वरूपाच्या असतात, मात्र यावर्षी मोसमामध्ये मार्च महिन्यामध्येच कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली, ऐन उन्हाळ्यात दरम्यानच्या काळात अवकाळी शिडकाव्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मे महिन्यातही कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती सर्व शहरांची असून मोचा चक्रीवादळाचा शहराच्या वातावरणावर परिणाम झाला आहे. 

रविवारपर्यंत उकाडा
मोचा चक्रीवादळामुळे हवामानातील आर्द्रता कमी होऊन कोरडेपणा येणार असून चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात. हवामान अभ्यासकांनुसार १४ ते १५ मेपर्यंत कडक ऊन आणि उकाड्याची स्थिती राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या