शिक्षकांना दणका  : ‘टीईटी’ संदर्भातील ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी- टिचर एलिजिबिलीटी टेस्ट) आव्हान देणार्‍या व उत्तीर्ण होण्यासाठी मुदत वाढीची मागणी करणार्‍या 89 याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी नुकत्याच फेटाळल्या.

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

या निर्णयामुळे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न  झालेले  प्राथमिक शिक्षक अपात्र ठरणार आहेत.

यासंदर्भात सागर बहिरे व इतर अशा 89 शिक्षकांच्या रिट याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या होत्या. भारत सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई) शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी मुदतवाढ देणयात आली होती. 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी न दिलेल्या शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही आणखी मुदतवाढ मागण्यासाठी आणि टीईटी परीक्षेलाच आव्हान देणार्‍या याचिका खंडपीठात दाखल झाल्या होत्या.

याशिवाय महाराष्ट्र शासनानेही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ दिली. मात्र, 31 मार्च 2019 ही शेवटची तारीख परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी असेल, त्यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही, असे शासनानेही स्पष्ट केले होते. यासंदर्भाने आदेशही काढण्यात आला होता. या नाराजीतून अनेक शिक्षकांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणात अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. ज्याची मुदत अंतिम निकालापासून चार आठवडे राहील. मुदत संपताच आपोआप अंतरिम स्थगिती संपुष्टात येईल, असे 44 पानी निकाल पत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 एप्रिल 2021 रोजी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अतुल.आर. काळे यांनी शासनातर्फे काम पाहिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *