Monday, April 29, 2024
HomeUncategorizedशिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी आता 'महास्टूडेंट ॲप'द्वारे

शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘महास्टूडेंट ॲप’द्वारे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती आता डिजिटल पद्धतीने होणार आहे. महास्टूडेंट ॲपद्वारे उपस्थिती घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे…

- Advertisement -

याबाबत शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी निर्देश दिले आहेत. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे वेगळे हजेरीपत्रक, तसेच मध्यान्ह भोजनाची वेगळी माहिती भरण्याच्या कामातून सुटका होणार आहे.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे.

भारत सरकारने पीजीआय निर्देशांक विकसित केला आहे. यात शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थितीसाठी गुण आहेत. यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीत शाळांच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने महास्टूडेंट ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता दिली आहे.

गुगल प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध

गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) MahaStudent या नावाने ॲप उपलब्ध आहे. या ॲपमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या