Wednesday, April 24, 2024
HomeUncategorized'टाटा पॉवर' उभारणार ५० चार्जिंग स्टेशन

‘टाटा पॉवर’ उभारणार ५० चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – aurangabad

शहरातील उद्योजकांनी (Marathwada Auto Cluster) मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून मिशन ग्रीन मोबिलिटी (Mission Green Mobility) हे अभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत तब्बल २५० इलेक्ट्रिक कार (Electric car) बुक केल्या असून १०१ कार शहरात दाखल झाल्या आहेत. या वाहनांसाठी (Tata Power) टाटा पॉवरच्या मदतीने मनपाच्या जागेवर ५० चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस चार्जिंगची सुविधा मोफत असेल. त्यानंतर दर निश्चित केला जाईल, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Administrator Astik Kumar Pandey) यांनी दिली.

- Advertisement -

एक चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारण्यासाठी १५ ते २० लाखांचा खर्च येईल. हा खर्च टाटा पॉवर करणार आहे. याविषयी टाटा पॉवरसोबत मनपा अधिकाऱ्यांची बैठक झाली. ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटाने ५० ई-चार्जिंग स्टेशन उभारून देण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या आठवड्यात सर्वेक्षण केले जाणार असून मनपाच्या मोकळ्या जागांवर हे स्टेशन उभारले जाणार आहे. सहा महिन्यांत चार्जिंग स्टेशन उभारून नागरिकांसाठी सुविधा पुरविली जाईल. त्यासोबतच महापालिकेने २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. मनपाच्या अर्थसंकल्पात चार्जिंग स्टेशनसाठी १० कोटी आणि बॅटरीसाठी १० कोटींची तरतूद केली आहे.

(E-vehicle) ई-व्हेइकलसाठी इतर शहरांत चार्जिंग स्टेशन खरेदी करण्यावर निधी खर्च केला जात आहे. परंतु मनपा चार्जिंग स्टेशन खरेदीवर खर्च करणार नाही. मनपाच्या जागेवर चार्जिंग स्टेशन उभारले जातील. १५ व्या वित्त आयोगातून मनपाच्या जमिनींचा विकास केला जाईल. टाटा पॉवरकडून अटी व शर्तीवर ५० चार्जिंग स्टेशनचा वापर केला जाणार असल्याचे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या