Video : तुमचे आरोग्य, कल्याणाची सूत्रे आता तुमच्या हाती घ्या!

Video : तुमचे आरोग्य, कल्याणाची सूत्रे आता तुमच्या हाती घ्या!

आंतरराष्ट्रीय योग दिनी सद्गुरुंचा संदेश

नाशिक | प्रतिनिधी

"यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्वीच्या योग दिनांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे" असे वर्णन करताना ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी कमीतकमी संघर्षाने जीवनाच्या कठोरतेतुन पार पडण्यासाठी शारीरिक आणि मानसिक लवचिकता बळकट करण्यावर भर दिला...

ईशाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडियो संदेशात, सद्गुरु म्हणाले, "एक चैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे, एक आनंदी आणि एकाग्र मन आणि तुमच्या आत निरंतर वाहणारी उर्जा आजच्या या बाह्य हल्ल्यांचा सामना करण्यासाठी अधिक गरजेचे आहे, जे आज वैज्ञानिक म्हणत आहेत की हा विषाणू हल्ला पुन्हा पुन्हा होऊ शकतो.

यावेळीतीन योग सरावाचा एक व्हिडिओ ऑनलाईनच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे; जो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करू शकतो, फुफ्फुसांची क्षमता वाढवू शकतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी उंचावण्यास मदत करणार आहे.

साष्टांग, मकरासन आणि सिंहक्रिया सराव, "या ग्रहावरील प्रत्येक मनुष्याने याचा उपयोग करावा आणि आरोग्य आणि डॉक्टरांवर अवलंबून न राहता स्वतःच त्यांनी त्यांचे आरोग्य आणि कल्याणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. "आरोग्य हे काही आपल्याला डॉक्टर किंवा वैद्यकीय सेवा देणान्यांकडून लाभत ते आपल्या आतूनच यायला असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी ईशाने ५०० योग सत्रांचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय योग दिना दिवशी जगभरात १ लाख ३० हजार नागरिकांपर्यंत पोहोचली होती. तामिळनाडू कारागृहात जवळपास १५ अहज्र ६०० कैदी, वॉर्डन आणि तुरूंगातील इतर कर्मचान्यांपर्यंत योग सत्रांची अनेक विनामूल्य आयोजित करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com