Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedतर औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा!

तर औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करताय मग आम्हाला खुलताबादेतील औरंगजेबाची (Aurangzeb) कबरही येथे नको, ती तुम्ही हैदराबादला घेऊन जा, एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा येथे येण्या-जाण्याचा त्रास कमी होईल, असा खोचक सल्ला आमदार संजय शिरसाट यांनी दिला. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही हीच भूमिका घेत पंतप्रधानांना याबाबत पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. 

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर समर्थनात आयोजित सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना आ. शिरसाट बोलत होते.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले होते. ३४ वर्षांपासून येथील जनता या शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नाव व्हावे, अशी मागणी करीत होती. केंद्र सरकारने शहराचे नामांतर केले. मात्र याचा काही लोकांना पोटशूळ उठला आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. 

छत्रपती संभाजीनगरला विरोध करणारा ओवेसींचा पक्ष आहे. तुम्हाला जर छत्रपती संभाजीनगर नको असेल तर खुलताबादेतील औरंगजेबाची कबर कशाला हवी, औरंगजेब अहमदनगरजवळ मेला होता आणि खुलताबादला आणला. त्याच्या कबरीवर माथा टेकवण्यासाठी ओवेसींना हैदराबादहुन येथे यावे लागते. येथे बिर्याणी खाल्ल्यानंतर खुलताबादला जावे लागते. तेथून पुन्हा छत्रपती संभाजीनगर मार्ग हैदराबादला जावे लागते. ओवेसींना किती हा त्रास होतो त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा, अशी भूमिका आ. शिरसाट यांनी मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या