Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकुरिअरने मागवल्या तलवारी!

कुरिअरने मागवल्या तलवारी!

औरंगाबाद – Aurangabad

ब्लू डर्ट कुरिअरने (Blue Dirt Courier) शहरात आलेल्या पाच तलवारी पुंडलिकनगर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दानिश खान व्यक्तीच्या नावाने आलेले हे पार्सल पोलिसांनी त्याच्या हातात पडण्यापूर्वीच जप्त केले असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

- Advertisement -

शहरात ब्लू डर्ट (Blue Dirt Courier) या कुरिअर सेवेने शहरात तलवारीचा (Sword) बॉक्स आला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस (Police) यंत्रणा कामाला लागली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिडको एन-४ येथील मंदिरासमोर कुरिअरच्या वाहनाला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका बॉक्समध्ये मॅनसह पाच तलवारी आढळून आल्या. या तलवारी अरमान इंटरप्राईजेस, ७० इंद्रजित कॉलनी, ए. एस. आर. या ठिकाणाहून दानिश खान याच्यासाठी आल्याचे दिसत आहे. या बिलावर दानिशचा क्रमांक दिलेला आहे. कुरिअर बॉय प्रकाश वाढे याने सांगितले की, दानिश हा वेगवेगळ्या ठिकाणी येऊन पार्सल घेतो, यापूर्वी त्याला पार्सल दिलेले आहेत. अरमान इंटरप्राईजेस (Arman Enterprises) तलवारीच्या बॉक्सवर वुड हॅण्ड क्राफ्ट असे लिहून दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव यांच्या तक्रारीवरुन दानिश खान व अरमान इंटरप्राईजेसच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या