Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedस्वरझंकार महोत्सव : 'खामोश लब है, झुकी है पलकें, दिलों में उल्फत...

स्वरझंकार महोत्सव : ‘खामोश लब है, झुकी है पलकें, दिलों में उल्फत नयी नयी हैं’

औरंगाबाद – aurangabad

संत एकनाथ रंगमंदिरात (Sant Eknath Rangmandir) रंगलेल्या (Swarjhankar Festival) स्वरझंकार महोत्सवात ज्येष्ठ लोकप्रिय सतारवादक उस्ताद सुजात हुसेन खान यांनी ‘खामोश लब है, झुकी है पलकें, दिलों में उल्फत नयी नयी हैं’ हे गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. अडीच तास चाललेल्या या संगीत मैफलीत उस्ताद सुजात हुसेन खान यांना तबल्यावर मुकेश जाधव यांनी साद दिली.

- Advertisement -

व्हायोलिन अकादमी व एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीच्या वतीने १३ मे रोजी संत एकनाथ रंगमंदिरात स्वरझंकार मैफल चांगलीच रंगली. गेल्या दहा वर्षांपासून स्वरझंकार महोत्सवाच्या माध्यमातून व्हायोलिन अकादमी औरंगाबादकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी देत आहे. यंदा इटावा घराण्याचे ज्येष्ठ लोकप्रिय सतारवादक उस्ताद सुजात हुसेन खान हे मैफलीचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी सतार वादनाबरोबरच काही शास्त्रीय बैठक असलेल्या गझल सुद्धा नजकदारपणे सादर केल्या.

सुरुवातीला त्यांनी राग यमन सादर केले. राग यमनच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायन, वादन व नृत्य यांच्यातील वेळेच्या समान अंतरास ‘लय’ असे म्हणतात. मध्य लय, विलंबित लय, द्रूत लय सतार आणि तबल्याच्या साथ संगतीने रसिकांमध्ये उत्साह संचारला. बंदिश सादर करतानाच उस्ताद सुजात हुसेन यांनी ‘खामोश लब है, झुकी है पलकें, दिलों में उल्फत नयी नयी हैं’, ‘जिंदगी से बढकर’, ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे’, ‘ऐ री सखी मोरे पिया घर आए, भाग लगे इस आंगन को, बल-बल जाऊं मैं अपने पिया के, चरन लगायो निर्धन को’ यासह एकापेक्षा एक गझल, गीते सतार वादनासह गायले.त्यांना तबल्यावर मुकेश जाधव यांनी भारदस्त अशी साद दिली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी स्वर्गीय शिवकुमार शर्मा यांनी शिकवलेली पहाडी सादर करून रसिक श्रोत्यांच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी उद्योगपती राधावल्लभ धूत, मनीष धूत, लोकमान्य मल्टिपर्पजचे प्रवीण जाधव, विलो पंप्सचे श्रीकांत देशपांडे, उद्योगपती प्रसाद कोकीळ, मिलिंद कंक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी नीलेश कुंभकर्ण, ऑर्लीकोन बालझर्सचे औरंगाबाद प्रमुख कमलेश कुमार आणि व्हायोलिन अकादमीचे सचिव पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या कार्यक्रमाला बुर्गे यांचे विशेष सहकार्य लाभले असून पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज, विलो पंप्स, ऑर्लीकोन बालझर्स, अँड्रेस हौसर आणि चितळे एक्सप्रेस हे सहप्रायोजक होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या