रसिकांसाठी मेजवानी ; औरंगाबादमध्ये रंगणार 'स्वरझंकार' मैफल

रसिकांसाठी मेजवानी ; औरंगाबादमध्ये रंगणार 'स्वरझंकार' मैफल

औरंगाबाद - aurangabad

व्हायोलिन अकादमी (Violin Academy) व एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीच्या (MIT World Peace University) वतीने औरंगाबादमध्ये येत्या १३ मे रोजी रात्री ८ वाजता एका विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. अकादमीतर्फे स्वरझंकारच्या माध्यमातून पं. शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma), हरिप्रसाद चौरासिया, पं. हरिहरन, उस्ताद झाकीर हुसेन, पं. राजन साजन मिश्रा अशा अनेक दिग्गजांचे गायन-वादनाचा आनंद गेले १० वर्षांपासून औरंगाबादमधील रसिक घेत आहेत.

रसिकांसाठी मेजवानी ; औरंगाबादमध्ये रंगणार 'स्वरझंकार' मैफल
औरंगाबादची पाणीटंचाई दूर करणार जुन्या विहिरी!

या विशेष मैफलींमध्ये इटावा घराण्याचे जगद्विख्यात सतार वादक उस्ताद विलायत खान यांचे सुपूत्र ज्येष्ठ लोकप्रिय सतारवादक उस्ताद सुजात हुसेन खान यांच्या सतारीच्या स्वरानंद रसिक अनुभवणार आहेत. आपल्या वादनाबरोबरच काही शास्त्रीय बैठक असलेल्या गझल सुद्धा ते नजकदारपणे सादर करतील. त्यांना तबल्यावर साथ मराठवाड्यातील लोकप्रिय तबला वादक मुकेश जाधव करणार आहेत.

या कार्यक्रमाला बुर्गे यांचे विशेष सहकार्य लाभले असून पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज, विलो पंप्स, ऑर्लीकोन बालझर्स, अँड्रेस हौसर आणि चितळे एक्सप्रेस हे सहप्रायोजक आहेत.

स्वरझंकार मैफल उस्मानपुऱ्यातील संत एकनाथ रंगमंदिरात रात्री ८ वाजता सुरू होणार असून हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स व संत एकनाथ रंगमंदिर येथे मंगळवारपासून उपलब्ध आहेत, अशी माहिती स्वरझंकारचे राजस उपाध्ये यांनी दिली.

Related Stories

No stories found.