Wednesday, April 24, 2024
HomeUncategorized'स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

औरंगाबाद – Aurangabad

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत होणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षेचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. पदवी, पदव्युत्तर व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. अंतिम वर्ष तथा सत्राच्या परीक्षा या विद्यापीठ स्तरावर होणार आहेत.

- Advertisement -

तर इतर सर्व परीक्षा क्लस्टर पद्धतीने महाविद्यालयीन स्तरावर होणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.

क्लस्टर पद्धतीने महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा (तिसरे व चौथे सत्र) या ८ ते १५ मार्च दरम्यान होणार आहेत. पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा (पहिले व दुसरे सत्र) या २३ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहेत. चार वर्षीय व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा (तिसरे, चौथे, पाचवे व सहावे सत्र) या ०८ ते १५ मार्च दरम्यान होणार आहेत. पाच वर्षीय व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षा (तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे व आठवे सत्र) या १६ ते २७ मार्च दरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम बीसीए,बीसीएस व इतर व्यवसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा (पहिले व दुसरे सत्र) या ०१ ते १० एप्रिल दरम्यान होणार आहेत. सर्व अभियांत्रिकी, विधी, बी.एड, एम.एड, एम.बी.ए, एम.पी.एड. व औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्षाच्या परीक्षा (पहिले व दुसरे सत्र) या १० ते २० एप्रिल दरम्यान होणार आहेत.

विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा (पाचवे व सहावे सत्र) या १६ ते २७ मार्च दरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (तिसरे व चौथे सत्र) बीसीए, बीसीएस, फार्मसी, विधी, अभियांत्रिकी अभ्यासक्रम अंतिम वर्ष तीन वर्षीय अभ्यासक्रमाचे (पाचवे व सहावे सत्र) चार वर्षीय अभ्यासक्रमाचे (सातवे व आठवे सत्र) तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे (नववे व दहावे सत्र) या परीक्षा २२ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहेत. एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ०१ ते ०७ एप्रिल दरम्यान होणार आहेत.

व्यवसायिक सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमास हिवाळी २०२० परीक्षेसाठी प्रात्यक्षिक परीक्षा लागू असल्यास अशा अभ्यासक्रमाच्या प्रत्यक्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या