मुंबई-नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू

सर्वाधिक लांब बोगदा 8.36 किमीचा
मुंबई-नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू

औरंगाबाद- Aurangabad

सध्या मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन bullet train प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झालेले असून समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने हा रेल्वे मार्ग असणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या समोर समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील प्रकल्पाचे प्रेझेन्टेशन Presentation of the project करण्यात आले. यामध्ये 60 टक्के जमीन समृद्धी महामार्गासाठी आणि उर्वरित 40 टक्के जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केली जाणार आहे. संपादित जमिनीला एकच भाव ठरवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नागपूर मुंबई समृद्धी मार्ग प्रमाणेच औरंगाबाद, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन bullet train जाणार आहे. यामध्ये रेल्वे प्रवासी क्षमता 750 असून प्रकल्पाची लांबी 739 किलोमीटर आहे. यामध्ये 14 स्थानके असतील 28 तालुक्यातील 387 गावांमधील 1245.61 हेक्टर जमीन यासाठी दिली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक लांब बोगदा longest tunnel 8.36 किमीचा असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com