Tuesday, April 23, 2024
HomeUncategorized'सायबर सिक्युरिटी'वर रविवारी कार्यशाळा

‘सायबर सिक्युरिटी’वर रविवारी कार्यशाळा

औरंगाबाद – aurangabad

शहरातील नामांकित अशा व्हर्सटाईल टेक्नॉलॉजीच्या (Versatile technology)वतीने २० मार्च रोजी हॉटेल ग्रँड मोदी (Hotel Grand Modi) (क्रांती चौकाजवळ, अदालत रोड) येथे एक दिवसीय एथिकल हॅकिंग व सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॅप्चर द फ्लॅग’ (सीटीएफ) या अनोख्या आव्हानात्मक अशा स्पर्धेच्या माध्यमातून कार्यशाळा रंगणार असून उपस्थितांना देखील त्यात सहभागी होता येणार आहे हे विशेष.

- Advertisement -

या कार्यशाळेत (Deputy Superintendent of Police Vishal Dhume) पोलीस उप-अधीक्षक विशाल ढुमे व पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असणार आहे. विवेककुमार राजेश वर्मा व कृष्णा वर्मा हे वर्ष २०१५ पासून एथिकल हॅकिंग व सायबर सिक्युरिटीवर कार्य करत असून आजवर असंख्य औरंगाबादकरांना त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीपासून कसे दूर राहता येईल याचे अत्यंत साध्या सोप्या भाषेत प्रशिक्षण दिले आहे.

आधी रिअल रॉयल इन्फोटेकच्या माध्यमातून सेवा देत होते. आता व्हर्सटाईल टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे बेसिकपासून एथिकल हॅकिंग, सायबर सिक्युरिटीजपर्यंतचे इत्यंभूत प्रशिक्षण दिले जाते. मोबाईल, सिस्टम, वेबसाईट, सर्व्हर, प्रायव्हेट सिक्युरिटीज यांचाही त्यात समावेश आहे. या कार्यशाळेत आपल्या संगणकाची सुरक्षितता कशी ठेवायची, डिलीट झालेला डेटा कशाप्रकारे परत मिळवायचा, ई कॉमर्स वेबसाईट कशी बनवायची, तिची सुरक्षितता कशा पद्धतीने हाताळायची, इंटरनेटच्या माध्यमातून होणारे बँकिंग फ्रॉड, त्यापासून कसे वाचायचे, एथिकल हॅकिंग म्हणजे काय, सायबर सिक्युरिटी काय असते, दररोजच्या जीवनात छोट्या चुकीमुळे कसे आर्थिक नुकसान होऊ शकते याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कार्यशाळेत सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार असून ‘कॅप्चर द फ्लॅग’ (सीटीएफ) या स्पर्धेत सहभागी होऊन आपली चुणूक देखील दाखवण्याची संधी मिळणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत पन्नासपेक्षा जास्त शाळकरी मुले आपले टॅलेंट दाखवतील. अगदी पाचवीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी एथिकल हॅकिंग, सायबर सिक्युरिटी, डेव्हलपर्सचे कौशल्य मान्यवरांसमोर सादर करतील. सायबर जगतात होत असलेल्या घडामोडींवर या कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात येणार असून जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विवेककुमार वर्मा यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या