Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकोरोनाकाळात सुमित नागलने केला मोठा कारनामा !

कोरोनाकाळात सुमित नागलने केला मोठा कारनामा !

बर्लिन –

भारताचा उदयोन्मुख टेनिसपटू सुमित नागल कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. जर्मनीमध्ये खेळवली गेलेली पीएसडी बँक नॉर्ड ओपन ट्रॉफी सुमितने आपल्या नावावर केली.

- Advertisement -

सुमितहा सध्या भारताचा सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. त्याने अंतिम सामन्यात पिनबर्ग टेनिस क्लबच्या दुसर्‍या मानांकित डॅनियल मसूरचा २-१, ६-३ असा पराभव केला.

या विजयानंतर सुमितने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘चार महिन्यांनंतर येथे परत आल्यावर छान वाटले. या स्पर्धेत आणि वास्तवाच्या पलीकडे जाऊन खेळणे चांगले आहे. ही एक छान स्पर्धा होती, जिथे ६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.‘

यापूर्वी डेव्हिस चषक स्पर्धेत सुमितने मार्चमध्ये क्रोएशियाविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. यापूर्वी झालेल्या इतर स्पर्धांपेक्षा या स्पर्धेचा अनुभव वेगळा असल्याचे सुमितने सांगितले. ‘‘स्पर्धेपूर्वी, सर्व खेळाडूंची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कोर्टमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, प्रत्येक खेळाडूला हात धुवण्यास सांगितले होते. प्रत्येकाला कमीतकमी दोन मीटर अंतरावर रहावे लागले’’, असे सुमितने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या