एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

सुसाइड नोट जप्त
एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद - Aurangabad

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) स्पर्धेत मेहनत घेऊनही अवघ्या एका गुणाने अपयश आल्याने नैराश्यातून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण मित्र मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. याप्रकरणी (Police) पोलिसांनी सुसाइड नोट (Suicide) जप्त केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

मृत किशोर हा मागील 6 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, त्याने धुळे येथे राहून दोन वर्षे तर मागील चार वर्षांपासून औरंगाबाद येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान नुकत्याच एमपीएससी परिक्षेच्या निकालात अपयश आल्याने तो खचला होता. याबाबत त्याने आपल्या आईला फोन करून नाराजी व्यक्त केली. आईनेही अजून प्रयत्न कर, नाहीतर घरी परत ये, असा धीर दिला पण सकाळी त्याने गच्चीवरील खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com