‘सूचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम’ स्पर्धा उत्साहात

औरंगाबाद- Aurangabad

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यासह या विभागातून एकूण ३० हजार ७१० विद्यार्थी सहभागी झाले होते.

आजघडीला स्वयंरोजगार, रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होणे आवश्यक आहे. आज अनेकांना शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी माहीत नाही. शहरी मुलांना गांडूळ खतनिर्मिती, सेंद्रिय शेती, सिंचन पद्धतीत रस नाही, माहितीही नाही. हवामान बदलामुळे होणाऱ्या अतिपावसामुळे माती वाहून जाते आहे. याच विषयावर जिल्हा स्तरावर लवकरच ही स्पर्धा होणार आहे.

विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शेती व्यवसाय, स्वयंरोजगार, महिला रोजगार, उपायुक्‍त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम तसेच अन्य उपयुक्‍त अभ्यासक्रम आदी विषय देण्यात आले होते. बदलते हवामान यामुळे कधी अतिपाऊस तर कधी कमी पाऊस, उष्णतेचे प्रमाणही वाढते आहे. अतिपावसामुळे जमीन वाहून जाते आहे तर कमी पाण्यातही चांगले पीक घेता येऊ शकते. ते कशा पद्धतीने आणि माती परीक्षण कसे करावे, हे विषय आयटीआयमध्ये अभ्यासक्रमात हवेत. ज्यामुळे कृषीविषयक माहिती होऊन शेतीविषयी आवड निर्माण होईल. यात रोजगारही आहे आणि स्वयंरोजगारही मिळेल, असे मत सहभागी विद्यार्थ्यांनी मांडले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *