औरंगाबादमध्ये प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर यशस्वी

आयव्हीएफ तंत्रज्ञानात भर
औरंगाबादमध्ये प्रथमच प्लाझ्मा थेरपीचा वापर यशस्वी

औरंगाबाद - aurangabad

लग्न (marriage) होऊन दहा वर्षे होऊन आणि टेस्ट ट्यूब बेबीच्या (Test tube baby) अनेक प्रक्रिया होऊनही बाळ न झालेल्या एका दाम्पत्याला त्यांच्या थिन एन्डीमेट्रियम समस्येवर औरंगाबादेतील जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बोलधने यांनी प्लाझ्मा थेरपी या प्रक्रियेचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून औरंगाबादेत प्रथमच पीआरपी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे.

वारंवार आयव्हीएफची मदत घेऊनही बाळ न झाल्याने नेमकी समस्या काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला भेट दिली असता थिन एन्डीमेट्रियमचे निदान झाले. त्यावर जोडप्याला प्लाझ्मा थेरपी अर्थात पीआरपी या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल असा निष्कर्ष निघाला. रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातून आयव्हीएफ सेंटरमध्ये पीआरपी तयार करण्यात आले. ते पीआरपी पाळीच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी गर्भ पिशवीत सोडण्यात आले. ते सोडल्यानंतर त्या रुग्णात दोन बाळांचे अंश (गर्भ) सोडण्यात आले. या जोडप्यात दोन्ही अंश (गर्भ) रुजले. आजघडीला गर्भधारणेचा चौथा महिना असून या यशाने दाम्पत्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.

आयव्हीएफ प्रक्रियेत यशस्वी गर्भधानेसाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. गर्भ पिशवीची गाधी सक्षम असणे, चांगल्या गुणवत्तेच्या बाळाचा अंश आणि दोघांमधील सौहार्दपूर्ण संभाषण याने गर्भ धारणेला नक्कीच मदत होते. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे १९७८ च्या तुलनेत सदरील प्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. तरीही चांगल्या बाळाचा अंश गर्भ पिशवीत सोडल्यानंतरही तो न रुजण्याचे प्रमाणही बरेच वाढले आहे. साधारणतः अंश न रुजल्याने एक तृतीयांश जोडप्यात बाळाच्या अंशाला दोषी मानले जाते तर दोन तृतीयांश जोडप्यात गर्भ पिशवीच्या गाधी आणि तिचे बाळाच्या अंशाबरोबरचे संभाषणाला दोषी मानले जाते. अशा प्रकारे गर्भ पिशवीची गाधी खराब असणे हा आयव्हीएफ प्रक्रियेतील एक मोठा आणि अवघड असा अडथळा ठरतो. सध्या यावर थिन एन्डीमेट्रियमचे जे उपचार उपलब्ध आहेत त्याचा वापर केल्यानंतरही यात विशेष सुधारणा होत नसल्याने काहीतरी नवीन उपचाराची गरज असते. नवीन तंत्रज्ञानाने प्लेटलेट रिच प्लाझ्माचा अशा गर्भ पिशवीवर यशस्वी प्रयोग झाला आहे.

थिन एन्डीमेट्रियम आणि अंडाशयात स्त्री बीजाचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांमध्ये पीआरपी तंत्रज्ञानाचा वापर आम्ही सुरू केला असून त्यात यशही आले आहे.

- डॉ. शिल्पा बोलधने, संचालिका, जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com