पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठपुस्तके!

नियोजन पूर्णत्वाकडे
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठपुस्तके!

औरंगाबाद - aurangabad

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी शिक्षण विभागाचे (Department of Education) नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील ३ लाख २० हजार ९६२ विद्यार्थ्यांना १५ लाख ६७ हजार ४९० मोफत पुस्तके मिळण्यासाठी (Balbharati) बालभारती'कडे मागणी करण्यात आली आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांचे बालभारती भांडाराकडून वितरण आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाल्यानंतर त्यांचे चेहरे आनंदाने खुलतात. कोरोनामुळे मागील वर्षी पुस्तकांची छपाई उशिराने झाल्याने विद्यार्थ्यांना उशिरा पुस्तके मिळाली. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने, वेळेत अन्‌ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याच्या हाती पुस्तके पडतील, याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. बालभारतीकडून ३० मेपर्यंत त्या-त्या तालुक्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पुस्तके केले जाते. ही पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, अनुदानित आदी शाळांना वितरित केली जातात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू होण्याअगोदरच पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारती'कडे नोंदविण्यात आली उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्याकडून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार आहे. १३ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पडतील असे नियोजन करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com