विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टिकोन वृद्धींगत करावा-जयदेव डोळे

विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टिकोन वृद्धींगत करावा-जयदेव डोळे

औरंगाबाद - aurangabad

स्पर्धा परीक्षांची (Competitive examination) तयारी करताना शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाच्या या योजनांची पडताळणी करत स्वत:चा चिकित्सक दृष्टिकोन वृद्धींगत करण्यावर भर देण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत जयदेव डोळे यांनी विद्यार्थ्यांना केले.

(Directorate General of Information and Public Relations) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (Divisional Information Office) विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित चित्र प्रदर्शनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात डोळे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक हेमराज बागूल, दयानंद माने, (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे डॉ. उत्तम अंभोरे, (District Information Officer Mukund Chilwant) जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक वंदना थोरात, माहिती अधिकारी मीरा ढास यांची उपस्थिती होती.

डोळे म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शासनांच्या अशा प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा. या माहितीचे चिकित्सक पद्धतीने अवलोकन करावे. चिकित्सक दृष्टीकोनातून लेखन करावे. लोकहिताचे कार्य करण्यासाठी कटीबद्ध रहावे. चारित्र्य, निष्ठा, विचार, गुणवत्ता याची काळजी घ्यावी. भाषेवर प्रभुत्व मिळवावे. उत्तम वाचन, वाचनातून उत्तम भाषा आणि विचार प्रगटतात, त्यामुळे सातत्याने वाचन करत रहावे. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, कथा, कांदबरी, नाटके वाचावीत. यातूनच सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास होऊन उत्तम अधिकारी व्हावे.

भारतासारख्या देशात दुर्बल, वंचित, पिडितांसाठी शासन अनेक योजना राबवत असते. त्यांचा योग्य लाभार्थ्यांना लाभ पोहोचल्याची खातरजमा करून पत्रकारांनी काम करणे अपेक्षित असते. शासनाच्या योजनांची माहिती शासन देत असतेच. परंतु वाचक, पत्रकार, नागरिक, लाभार्थ्यांनीही याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक असल्याचेही श्री.डोळे म्हणाले.

संपादक माने यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे चित्र प्रदर्शन सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती याठिकाणी पहावयास, वाचावयास मिळतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडणारी अशी माहिती या प्रदर्शनात असल्याने या प्रदर्शनाचा लाभ घ्यायलाच हवा, असेही श्री.माने म्हणाले.

सामाजिक लोकशाही, लोककल्याणकारी राज्यासाठी प्रत्येकाने निरपेक्ष भूमिकेतून कृती करणे आवश्यक असल्याचे डॉ. अंभोरे म्हणाले. समाजातील चित्रणाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी तरूणाईने पुढे येण्याची आवश्यकता आहे. तसेच आजच्या डिजिटल युगात भाषा महत्त्वाची असून ती बदलत आहे. परंतु प्रमाण भाषेचा वापर प्रत्येकाने करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

Related Stories

No stories found.