Monday, April 29, 2024
HomeUncategorizedनशाखोरीमुळेच गुन्हेगारीत वाढ-डॉ.नीलम गोऱ्हे

नशाखोरीमुळेच गुन्हेगारीत वाढ-डॉ.नीलम गोऱ्हे

औरंगाबाद – aurangabad

‘महिला, मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना या चिंतेचा विषय आहे. यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय सरकार घेत आहेत. भरोसा सेल, स्त्री शक्‍ती कायदा (Women Empowerment Act) याबरोबरच आता सातवीपासूनच्या वर्गात ‘स्टुडंट पोलिस कॅडेट’ (Student Police Cadet) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. शहरात नशाखोरीमुळेच गुन्हेगारी वाढली आहे,’ अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी केली.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हणाल्या, महिला सुरक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटोल तसेच गृहराज्यमंतर शंभूरजे देसाई यांची बैठक झाली असून, कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात दक्षता समिती, भरोसा सेल आदीबाबत आजच्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एकत्रित गरज आहे.

सुरक्षित कॅम्पस’ राबवा

या पत्रकार परिषदेनंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मराठवाड्यातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पोलिस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार’ (कॅम्पस) संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रॅगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना व्हावी, यासह विविध सूचना केल्या, यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, औरंगाबादचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, जालना पोलीस अधीक्षक आर. राजसुधा, बीड पोलिस अधीक्षक सुनील लांजवार यांच्यासह अन्य अधिकाऱयांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या