
औरंगाबाद - aurangabad
सिल्लोड (Sillod) येथे 1 ते 5 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी (agriculture) व सांस्कृतिक महोत्सवाचे (festival) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची भुमिका, कृषी विभागाचे कार्यक्रम, कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून हा कृषी महोत्सव शेतकऱ्याला सक्षम करणारा ठरणारा असल्याचे सांगूण महोत्सवासाठी वेळ कमी असल्याने शासनाच्या प्रत्येक विभागाने नेमूण दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी दिले.
यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, कृषी सहसंचालक तुकाराम मोटे तसेच जालना, बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, धुळे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) आणि कृषी विकास अधिकारी उपस्थित होते.