पोटविकाराकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक!

तज्ज्ञांचे मत; डॉक्टर्स दिन विशेष 
पोटविकाराकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक!

औरंगाबाद - aurangabad

मराठवाड्यामध्ये (Marathwada) वर्ष २०२० पूर्वी पोट व लिव्हर ( Liver) विकारासाठी (Patient) रुग्णांना ठिकठिकाणी जावे लागत होते. सर्व अद्ययावत सुविधा मिळत नसल्याने त्यावेळी रुग्णांना (mumbai) मुंबई, पुणे, हैदराबाद तसेच अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. या सर्व बाबींचा विचार करून पोट व लिव्हर विकार तज्ज्ञांच्या पाच जणांनी औरंगाबादमध्ये एकत्रित येत जीआय वन (Hospital) हॉस्पिटलची सुरुवात केली. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, लॅप्रोस्कोपी आणि खुल्या (Surgery) शस्त्रक्रियांची सुरुवात करण्यात आली.

रेल्वे स्टेशन रोडवर गोल्डी सिनेमाच्या बाजूला असलेल्या जीआय वन हॉस्पिटलमध्ये मेडीकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. वैभव गंजेवार (एमडी, डीएम), डॉ. अशोक मोहिते (एमडी, डीएम, डीएनबी), व डॉ. विनय झंवर (एमडी, डीएम, डीएनबी) आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. संदीप भालसिंग (एमएस, डीएनबी), डॉ. मुकेश राठोड (एमएस, FIAGES) यांचा समावेश आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत मराठवाडा तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो रुग्णांनी येथे उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेतला. हळूहळू मौखिक प्रसिद्धीने मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसोबतच गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि राजस्थानातील रुग्णांनी देखील जीआय वन हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करत याठिकाणी असलेल्या अद्ययावत अशा सुविधांचा लाभ घेतला. हा अनुभव लक्षात घेत हॉस्पिटलच्या वतीने अद्ययावत एन्डोस्कोपीक अल्ट्रासाऊंड (इ यू एस) ज्याद्वारे विना शस्त्रक्रिया शरीरातून बायप्सी करणे, वेगवेगळ्या भागातून पू काढणे, धोकादायक शस्त्रक्रिया सहजपणे करता येतात, कॅप्सूल एन्डोस्कोपी ज्याद्वारे आतडीतील सुक्ष्म रक्तस्त्रावाचे निदान करणे, हायट्रोजन ब्रेथ टेस्ट (एचबीटी), ऍडव्हान्स इन्फ्रारेड लॅप्रोस्कोपी ज्याद्वारे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना होणारी गुंतागुंत टाळणे यासारख्या अत्यंत उपयोगी गोष्टी साध्य करता आल्या आहेत तसेच अत्याधुनिक फायब्रोस्कॅन ज्याद्वारे लिव्हरची इजा ओळखणे सुविधा उपलब्ध करून दिली.मूळव्याध, भगंदर आणि फिशरसारख्या आजारांवरही अत्याधुनिक लेझरद्वारे शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. अन्न नलिका तसेच गुदद्वारासंबंधी तपासणी करण्यासाठी मॅनोमेट्री ची सुविधादेखील येथे उपलब्ध आहे.

अत्याधुनिक उपचार पद्धतीद्वारे विविध आजारांवर मात करता येणे शक्य असल्याने जीआय वन हॉस्पिटलमध्ये थर्ड स्पेस एन्डोस्कोपीद्वारे केली जाणारी POEM शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे जठर तसेच आतडीच्या अस्तरावरील गाठी काढणे (इएमआर/इएसडी), सर्व प्रकारच्या हर्नियावरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तसेच अतिशय क्लिष्ट समजली जाणारी लिव्हर, स्वादुपिंड, पानथरी आणि आतडीवरील शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तथा खुल्या पद्धतीने करण्याच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. सर्वोच्च रुग्णसेवेचा मापदंड समजला जाणाऱ्या एनएबीएच संस्थेची मान्यता मिळवणारे मराठवाड्यातील पहिले पोट व लिव्हर विकार हॉस्पिटल ठरले आहे. इतकेच नव्हे तर जीआय वन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. त्यामुळे विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये याठिकाणच्या डॉक्टरांना सहभागी होऊन मार्गदर्शनाची संधी सातत्याने मिळत आहे.

मराठवाड्यातील पहिल्या स्टोमा क्लिनिक (पोटावर काढलेला शौचाचा अनैसर्गिक मार्ग) याचीही सुरुवात करण्यात आली. आजवर शेकडो रुग्णांनी स्वतः शिकून स्वावलंबीपणे पूर्ण देखदेख करण्याची समर्थतता मिळवली आहे. रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाविषयी (लिव्हर ट्रान्सप्लांट) माहिती मिळावी या उद्देशाने लिव्हर ट्रान्सप्लांट क्लिनिकची सुविधा महिन्यातून चार वेळा देण्यात येते. पचनसंस्थेशी निगडित सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासोबतच रुग्णांसाठी आवश्यक सोनोग्राफी, सीटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब तसेच फार्मसी व कँटीनची सुविधाही येथे उपलब्ध आहे. सामाजिक बांधिलकी जपत जीआय वनच्या वतीने डॉक्टर तसेच फ्रंट वर्कर्ससाठी कोविडच्या कठीण काळातही हेपिटायटिस बी लसीकरण, मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच रुग्णालयाच्या प्रत्येक वर्धापनदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com