ग्रामस्वच्छता अभियानास सुरुवात ; प्रथम बक्षीस सहा लाखांचे

ग्रामस्वच्छता अभियानास सुरुवात ; प्रथम बक्षीस सहा लाखांचे

औरंगाबाद - aurangabad

भागातील जनतेचे आरोग्य सुधारणे व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य, केंद्र शासन (State, Central Govt) वेगवेगळ्या पद्धतींनी प्रयत्न करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा ( Sant Gadgebaba) ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा नव्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत ३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. गावागावात स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत तालुका कायम हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी, तसेच उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आणि वैयक्‍तिक शौचालयांचा वापर होण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले आहे.

६ लाखांचे बक्षीस

जिल्ह्यातून प्रथम येणार्‍या गटाला ६० हजार रुपये तर जिल्हास्तरावरील प्रथम येणार्‍या ग्रामपंचायतीस ६ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ४ लाख तर तृतीय पुरस्कार ३ लाख रुपयांचा आहे. विभागस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे १२ लाख, ९ लाख आणि ७ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावर प्रथम बक्षीस ५० लाख रुपयांचे आहे. द्वितीय बक्षीस ३५ लाख व तृतीय बक्षीस ३० लाख रुपये देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com