जि. प. अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत शिरसगाव लौकी संघ अजिंक्य

जि. प. अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत शिरसगाव लौकी संघ अजिंक्य

येवला । प्रतिनिधी Yeola

येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत शिरसगाव लौकी शाळेने तर बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य बोराडे याने प्रथम क्रमांक मिळविला.या दोन्हीही स्पर्धेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, केंद्रप्रमुख शशिकांत पानगव्हाणे व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुशारे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी अभिनंदन केले.

या स्पर्धेत कर्णधार म्हणून किशन बिंद तर उपकर्णधार म्हणून प्रसाद हांडोरे यांनी धुरा सांभाळली तर सुमेध पाटील,ओम थोरात,साई थोरात, आदित्य बोराडे, सत्यजित हांडोरे, नरेंद्र बुल्हे व आदित्य गवळी या विद्यार्थ्यांनी मोलाची साथ दिली.

या सर्व विद्यार्थ्यांना सूर्यभान पैठणकर व तंत्रस्नेही शिक्षक हनुमंत काळे यांनी मार्गदर्शन केले. दादा वाघमोडे, संगीता बोडके, आशा पगारे, अनिता गायकवाड यांचे सहकार्य लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश बुल्हे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघचौरे , येवला तालुका समता परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रवीण बुल्हे यांचे हस्ते करण्यात आला.

सत्कार प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन बुल्हे, जालीदर राऊत, विष्णू गवळी तसेच ग्रामस्थ गोरख राऊत, गणेश राऊत,घाडगे बाबा उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com