'सिक्सर किंग' पुन्हा मैदानात उतरणार!

युवराजने केली पुनरागमनाची घोषणा
'सिक्सर किंग' पुन्हा मैदानात उतरणार!

दिल्ली | Delhi

भारतीय क्रिकेट संघाचा (team india) माजी अष्टपैलू क्रिकेटपटी युवराज सिंग (yuvraj singh) याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बरेचसे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हाच युवराज क्रिकेटप्रेमींमध्ये सिक्सर किंग (Sixer King) म्हणूनही प्रसिद्ध आहे.

दरम्यान युवराज सिंग (Yuvraj Singh cricketing comeback) यानं एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. युवराज सिंगनं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. युवराज सिंह यानं इन्स्टाग्रामवर (instagram) पोस्ट करत फेब्रुवारी २०२२ मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपल्या क्रिकेटचाहत्यांच्या मागणीवरुन त्याने हा निर्णय घेतला आहे.

युवराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील क्षणचित्रे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘देव तुमचं नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!'

युवराज सिंहने ३ ऑक्टोबर २००० मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. युवराजने ३०८ एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५२ अर्धशतकं आणि १४ शतकांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com