Tokyo Olympics : भारताचे आणखी एक पदक निश्चित, कुस्तीपटू रविकुमार फायनलमध्ये

Tokyo Olympics : भारताचे आणखी एक पदक निश्चित, कुस्तीपटू रविकुमार फायनलमध्ये

दिल्ली | Delhi

भारतासाठी आजचा दिवस टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) अत्यंत महत्त्वाचा आहे. आज भारताची ऑलिम्पिकमधील (Olympics) सुरुवात सकारात्मक झाली आहे. दरम्यान टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून आज भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे.

पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) ची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी (Nurislam Sanayev) होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे.

रवी कुमारनं (Ravi Kumar) सामन्याच्या सुरुवातीला २-१ अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं (Sanayev) जोरदार खेळ करत रवीवर (Ravi Dahiya) ९-२ ने आघाडी घेतली. त्यानंततर सानायेवला फिटनेसची समस्या जाणवली. त्यामुळे रवीनं ही आघाडी ५-९ ने कमी केली. रवीनं त्यानंतर जोरदार खेळ करत ७-९ नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.

लव्हलिना बोर्गोहेनचा विजयी पंच

बुधवारी सकाळी भारताची महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) हिने पदकांची संख्या ३ वर नेली होती. लव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. मला सुवर्ण पदक जिंकायचेय, असा निर्धार लव्हलिना बोर्गोहेनने बोलून दाखविलेला होता. मात्री बुधवारी उपांत्य फेरीत तिच्यापुढे विद्यमान जगज्जेती असललेल्या तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली हिचे आव्हान होतं. बुसेनाज सुरमेनेलीला लव्हलिनाने कडवट झुंज दिली, मात्र तिचे प्रयत्न तोकडे पडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com