
मुंबई | Mumbai
महिला आयपीएलमध्ये (WPL 2023) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (royal challengers bangalore) संघाचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता युपी वॉरियर्स (UP Warriors) संघाशी होणार आहे. हे दोन संघ महिला आयपीएलच्या आठव्या सामन्यादरम्यान समोरासमोर असतील...
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा स्पर्धेतील हा चौथा सामना असून मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध पराभव झाल्यामुळे बंगळूर संघ अडचणीत सापडला आहे. पराभवाचा चौकार टाळण्यासाठी बंगळूरू नवीन रणनीती आखून मैदानात उतरणार आहे.
स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी बंगळूर संघाला विजय अनिवार्य असणार आहे. युपी वॉरियर्स संघाचे कर्णधारपद एलिसा हिली सांभाळणार आहे. तर स्मुती मंधाना आरसीबीचे नेतृत्व करणार आहे.
हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८-१ आणि स्पोर्ट्स १८ एचडी वाहिनीवर करण्यात येणार आहे. मागील ३ सामान्यांपासून मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्मुती मंधाना कडून मोठी खेळी आरसीबी संघाला अपेक्षित असणार आहे.
मागील ३ सामन्यात आपला स्पर्धेतील पहिला विजय संपादन करण्यासाठी आरसीबी अतुर आहे. युपी वॉरियर्स संघाचे २ सामने झाले असून, गुजरात जायंट्स संघाचा पराभव केला आहे.
तर दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्यासाठी यूपी वॉरियर्स सज्ज असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास उद्याच्या सामन्यात युपी वॉरियर्स संघाचे विजयासाठी पारडे अधिक जड दिसत आहे.