World Cup 2023 : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचं पारड जड? कोण मारणार बाजी?

World Cup 2023 : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचं पारड जड? कोण मारणार बाजी?

दिल्ली | Delhi

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी १४ ऑक्टोबर  २०२३ रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना खेळविण्यात येणार आहे.हा सामना जगातील सर्वात मोठ्या मौदानावर म्हणजेच अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता खेळवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने सलामीच्या दोन्ही लढतीमधे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाला पराभूत केले आहे.आता पाकिस्तान संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला संधी मिळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने नेदरलँड्स आणि श्रीलंका संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करून आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताविरुद्ध आपला पहिला विजय संपादन करण्यासाठी पाकिस्तान बाबर आझमच्या नेतृत्वात इतिहास रचण्यासाठी उतरणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाला अहमदाबाद येथील सामन्यापूर्वी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सलामीवीर फलंदाज शुभमन गील डेंग्यू या आजारातून पूर्णपणे बरा झालेला आहे. त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळणार का? ते पाहाणं महत्वाचे असणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात शानदार शतक झळकावून भारतीय कर्णधार रोहित शर्मा, लयीत परतला असल्यामुळे पाकिस्तान संघाचे टेन्शन वाढलं आहे. ईशान किशन विराट कोहली लयीत आहेत.गोलंदाजीमधे जसप्रीत बुमराह, महमंद सिराज, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव,आर अश्विन, हार्दिक पांडया संघाला निर्णायक क्षणी विकेट्स काढुन देत आहेत.


पाकिस्तान संघाबद्दल बोलायचं झाल्यास महमंद रिझवान, अब्दुल्ला शफिक, महमंद नवाझ,साऊद शकील चांगली कामगिरी करत आहेत. कर्णधार बाबर आझम, इमाम उल हक,फकर झमान, इफ्तिकार अहमद यांच्याकडून मोठी खेळी पाकिस्तान संघाला अपेक्षित असणार आहे. गोलंदाजीत शाहिन आफ्रिदी,हरीस रौफ,हसन अली,शादाब खान, महमंद नवाझ महत्वाच्या क्षणी संघाला बळी मिळवुन देत आहेत.


विशेष म्हणजे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामन्याच्या दिवशी हजेरी लावण्याची शक्यता आहे.याशिवाय बॉलीवूडमधील लोकप्रिय संगीतकार शंकर महादेवन आणि अरजितसिंग, यासह २०० बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. सामन्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांचे ११०००हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

याशिवाय दहशतवाद विरोधी पथक, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, तसेच गुजरात पोलिसांचा समावेश असणार आहे. सामन्याच्या दिवशी हलका पाऊस अपेक्षित आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com