
मुंबई | Mumbai
दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) उद्यापासून महिलांच्या अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप (Women's U19 World Cup) विजेतेपदाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत १६ संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेच्या विजेतेपदासाठीचा थरार रंगणार आहे...
विशेष म्हणजे महिलांचा समावेश असलेला हा पहिलाच विश्वचषक असणार आहे. सर्व सामने २० षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण ४१ सामन्यांचा थरार रंगणार आहे.
शेफाली वर्माच्या भारतीय संघाचा सलामी सामना आज सायंकाळी ५.१५ वाजता दक्षिण आफ्रिका संघाशी होणार आहे. स्पर्धेत एकूण २४० खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये ४५ खेळाडू मूळ भारतीय वंशाचे आहेत.
सलिल परांजपे, नाशिक.