Women T20 World Cup : भारत-इंग्लंड आज आमनेसामने

Women T20 World Cup : भारत-इंग्लंड आज आमनेसामने

नवी दिल्ली | New Delhi

 भारत आणि इंग्लंड संघ (India Vs England) आयसीसी टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेच्या सामन्यात शनिवारी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी एकमेकांसमोर येणार आहेत... 

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकून गटात पहिल्या दोन स्थानी असलेला इंग्लंड आणि भारत यांच्यात आज लढत होणार आहे. विजयी हॅटट्रिकसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. तर विजेता संघ गटात अव्वल स्थानी जाणार असून पुढच्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जाईल. त्यामुळे भारत आणि इंग्लडसाठी ही प्रतिष्ठेची लढत असल्याचे बोलले जात आहे.

भारत आणि इंग्लंड हे संघ तुल्यबळ असून दोन्ही संघांनी विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला (Pakistan and West Indies) पराभवाचे पाणी पाजले आहे. इंग्लंडनेही दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान गाठले आहे. जेमीमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, रीचा घोष, राधा यादव, दीप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी करत छाप सोडली आहे. भारताचे सलामीवीर मात्र तितके यशस्वी ठरलेले नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तसेच विजयी हॅट्रिक करण्याचा भारत आणि इंग्लंड संघांचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघाच्या खात्यात एकसमान गुण आहेत. मात्र, सरस धावगतीच्या बळावर इंग्लंड अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाला पराभूत करून आपला स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवून अव्वल स्थान कायम राखण्याचा इंग्लंड संघांचा प्रयंत्न असणार आहे.

Women T20 World Cup : भारत-इंग्लंड आज आमनेसामने
रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

दरम्यान, भारताच्या संघानेही पुरेपूर तयारी दर्शवत आपली कामगिरी उत्तम ठेवण्याची मानसिकता ठेवली आहे. तर संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com