महिला T20 विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर

महिला T20 विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर

मुंबई | Mumbai

आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप (ICC Womens T20 World Cup) २०२३ चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत (South Africa) करण्यात आले असून या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे...

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा सुरू होणार असून चाहते यासाठी आतापासूनच उत्सुक आहेत. विशेष म्हणजे आयसीसी महिला टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा (India and Pakistan) समावेश एकाच गटात करण्यात आला आहे. दोन्ही संघांमध्ये १२ फेब्रुवारीला सामना खेळविण्यात येणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाने ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून त्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात भारत,पाकिस्तान, इंग्लंड, वेस्टइंडीज आणि आयर्लंडचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात १० फेब्रुवारी २०२३ रोजी सलामीचा सामना खेळविण्यात येणार आहे.

तर अखेरचा साखळी सामना २१ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशमध्ये होणार आहे. याशिवाय २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पहिला उपांत्य सामना खेळविण्यात येणार असून दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. तर २६ फेब्रुवारीला अंतिम सामना खेळविण्यात येणार असून सर्व सामने केपटाऊन आणि पार्ल (CapeTown and Paarl) मैदानावर खेळविण्यात येतील. तसेच उपांत्य सामने केपटाऊन येथे होतील.

असे आहेत भारताचे सामने

१२ फेब्रुवारी पाकिस्तान

१५ फेब्रुवारी वेस्टइंडीज

१८ फेब्रुवारी इंग्लंड

२० फेब्रुवारी आयर्लंड

सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com