Women T20 World Cup : इंग्लंड-पाकिस्तान आज आमनेसामने, कुणाचे पारडे जड?

Women T20 World Cup : इंग्लंड-पाकिस्तान आज आमनेसामने, कुणाचे पारडे जड?

नाशिक | Nashik

आयसीसी महिला टी२० वर्ल्डकप (ICC Women's T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेत केपटाऊन (Cape Town) येथे आज सायंकाळी ६:३० वाजता इंग्लंड संघाचा (England team) सामना पाकिस्तान संघाशी (Pakistan team) होणार आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाने आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात भारतीय संघावर ११ धावांनी विजय संपादन करून आयसीसी टी२० वर्ल्डकप क्रिकेट (Cricket) स्पर्धेतील उपांत्य सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला आहे. आता साखळीतील चौथा सामना आपल्या नावावर करून विजयी चौकारासाठी इंग्लंड सज्ज असणार आहे

भारतीय संघाने (Indian team) सोमवारी आयर्लंड संघावर (Team Ireland) विजय संपादन केल्यामुळे पाकिस्तान आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Women T20 World Cup : इंग्लंड-पाकिस्तान आज आमनेसामने, कुणाचे पारडे जड?
Dadasaheb Phalke Award 2023 : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

आजच्या सामन्यात विजय मिळवून आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी पाकिस्तान बिस्माह मारूफच्या (Bismah Maruf) नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. इंग्लंड संघाचं नेतृत्व नाईटकडे असणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पधेर्तील हा १९ वा सामना दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे.

सलील परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com