
दिल्ली | Delhi
कोलकाता नाईट रायडर्सने ( KKR) रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) ३ गडी राखून पराभव केला. रिंकू सिंगने (Rinku singh 5 sixes) शेवटच्या षटकात सलग ५ षटकार ठोकून सामना जिंकवला. रिंकून एकूण सहा षटकार ठोकले.
शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku singh 5 sixes gt highlights) सलग ५ षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने २१ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली.
अलिगडमध्ये जन्मलेल्या रिंकू सिंहचा क्रिकेटमधील आतापर्यंत प्रवास सोपा नव्हता. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन तो येथे पोहोचला आहे. त्याचे वडील घरोघरी सिलिंडर देण्याचे काम करायचे. दोन खोल्यांच्या घरात बालपण घालवणाऱ्या रिंकूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी रिंकूने साफसफाईचे काम करण्याचाही विचार केला.
मात्र, शेवटी त्याने सर्व काही सोडून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. रिंकू यापूर्वी यूपीच्या अंडर-१६, अंडर-१९ आणि अंडर-२३ मध्ये खेळला. त्यानंतर सेंट्रल झोनमधून खेळत त्याने रणजी गाठली. रणजीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकूला सर्वात पहिल्यांदा २०१७ च्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने विकत घेतले होते. पण त्यावर्षी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
त्यादरम्यान पंजाबने रिंकूला १० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. यानंतर २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने रिंकूला ८० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. रिंकू २०१८ पासूनच केकेआरचा भाग आहे. तसेच, केकेआरने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात रिंकूवर ५५ लाखांची बोली लावत त्याला विकत घेतले.