विंडीजचा मालिकाविजय तर ख्रिस गेलचा नवा विक्रम

विंडीजचा मालिकाविजय तर ख्रिस गेलचा नवा विक्रम

सेंट ल्युसिया | Sent Lucia

विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (WI Vs AUS) यांच्यात आज मंगळवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी २० (Third T20) सामन्यात विंडीजने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून दणदणीत पराभव (WI Win) केला. आणि ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत ३-० ने (Series Win) विजयी आघाडी संपादन केली आहे.

डेरेन सॅमी नॅशनल क्रिकेट मैदानावर (Darren Samy National Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलिया संघाने (Australia Team) आपल्या निर्धारित २० षटकात ६ बाद १४१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने संथ सुरुवात केल्यामुळे त्यांना धावफलकावर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरन फिंच (Captain Aron Finch) ३०, मॅथ्यू वेड २३ धावा काढल्या. मागील २ सामन्यात निर्णायक अर्धशतक झळकावणारा अष्टपैलू मिचेल मार्श ९ (Michel Marsh) धावा काढून तंबूत परतला. मोझेस हेन्रीक्स ३३, आणि एस्टर्न टर्नर २४ यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली. विंडीजकडून हेडन वॉल्श २, ओबेड मकाय , डीजे ब्रावो आणि फेबियन अलेन यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.

धावांचा फठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीज संघाची (West Indies Team) सुरुवातही अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर स्फोटक फलंदाज आंद्रे फ्लेचर (Andre Fletcher) केवळ ४ धावा काढून माघारी परतला. त्याला मिचेल स्टार्कने (Michel Starc) बाद केले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या क्रिस गेलने लिंडल सिमन्स सोबत ३८ धावांची निर्णायक भागीदारी रचून संघाची बिघडलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणली. सहाव्या षटकात गोलंदाजीस आलेल्या मेरिडिथ याने सिमन्सला बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले.

सिमेन्स बाद झाल्यावर कर्णधार निकोलस पुरण आणि क्रिस गेलनं संघाचा डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची निर्णयक भागीदारी रचली. मागील २ सामन्यात शांत असलेली क्रिस गेलची बॅट अखेर चांगलीच तळपली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६७ धावा काढल्या.

टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील त्याने आपलं १४ वे अर्धशतक झळकावले. तसेच टी २० क्रिकेट सामन्यांमध्ये १४ हजार धावांचा टप्पा देखील पार केला.

कर्णधार पुरण याने २७ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकार ठोकून शानदार ३२ धावा केल्या. अष्टपैलू डीजे ब्रावो ७ धावा काढून तंबूत परतला. आंद्रे रसेलने २ चेंडूंमध्ये ७ धावा काढल्या. आणि विंडीजचा विजय साकार केला. क्रिस गेलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता चौथा सामना गुरुवारी पहाटे ५ वाजता खेळवण्यात येणार आहे.

-सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com