IPL 2021 : सेहवागची भविष्यवाणी! ‘हा’ संघ करणार मालिकेवर कब्जा

IPL 2021 : सेहवागची भविष्यवाणी! ‘हा’ संघ करणार मालिकेवर कब्जा

मुंबई | Mumbai

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना (IPL 2021) आजपासून सुरू होणार आहे. सामने सुरु होण्याआधीच टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) याने ही स्पर्धा कोण जिंकणार याची भविष्यवाणी केली आहे.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या सामन्याने आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु होत आहे.

आयपीएल स्पर्धा आता यूएईमध्ये (UAE) स्थलांतरित झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सकडेदेखील विजयाची चांगली संधी आहे.

दुसऱ्या टप्प्यात आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. माझ्या मते दिल्ली आणि मुंबईची टीम विजेतेपदाची दावेदार असेल, असे सेहवाग म्हणाला.

पहिल्या टप्प्यात चेन्नईचा सरासरी स्कोअर 201 होता. पण यूएईच्या पिचवर त्यांच्या बॅटींगवर परिणाम होईल. एका टीमची निवड करायची असेल तर ती टीम मुंबई असेल, असेदेखील सेहवाग म्हणाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com