मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा 'पुष्पा' डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा 'पुष्पा' डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

मुंबई | Mumbai

नुकताच ऑस्ट्रेलियाचा धाकड खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा (Glenn Maxwell) विवाह सोहळा पार पडला. भारतीय वंशाची विनी रमण (Vini Raman) हिच्याशी त्याने विवाह (Wedding) केला आहे...

विवाह होता मॅक्सवेलचा मात्र चर्चा झाली ती विराट कोहलीची (Virat Kohli). मॅक्सवेलने त्याच्या विवाहानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या (Royal Challengers Bangalore) संघाला एक खास पार्टी दिली. बंगळूरूचे सर्व खेळाडू यात सहभागी झाले.

या पार्टीचे काही व्हिडीओ (Video) आता समोर येत आहेत. यात विराट कोहलीच्या डान्सचा (Dance) देखील व्हिडीओ आहे. विराटने यात काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून त्याचा डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबीचे (RCB) बरेच खेळाडू थिरकताना दिसत आहे.

मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा 'पुष्पा' डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ
Visual Story : अबब! 'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

विराटच्या डान्सला त्याच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिल्याचे दिसून येते. तर यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) विराटची खेळी निराशाजनक राहिल्याने काहींनी त्याच्यावर टीका केलेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com