'किंग कोहली' बनला 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'

वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीची पोचपावती
 'किंग कोहली' बनला 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'

दिल्ली | Delhi

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीने मागील वर्षीपासून ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Men's Player of the Month) हा पुरस्कार प्रदान करायला सुरुवात केली. दर महिन्याला त्या-त्या महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या एका पुरुष आणि एका महिला क्रिकेटपटूला हा पुरस्कार दिला जातो.

ऑक्टोबर महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार विराटला मिळाला आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा व दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर हेही या शर्यतीत होते, परंतु विराटने बाजी मारली. ३३ वर्षीय विराटने पाकिस्तानविरुद्ध केलेली नाबाद ८२ धावांची अविस्मरणीय खेळी त्याला हा पुरस्कार मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.

१६० धावांचा पाठलाग करताना भारताचे ४ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते, परंतु विराटने पाचव्या विकेटसाठी हार्दिक पांड्यासह ११३ धावा जोडल्या. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावा करताना भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

विराट कोहलीने आतापर्यंत ICC क्रिकेटर ऑफ द डिकेड, ICC ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड, ICC क्रिकेटर ऑफ द इयर, ICC ODI प्लेयर ऑफ द इयर, ICC टेस्ट प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकले आहेत. यातील अनेक पुरस्कार असे आहेत की विराट कोहलीने एकापेक्षा जास्त वेळा आपल्या नावावर केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com