
मुंबई | Mumbai
माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमधील (T20 World Cup) भारतीय संघातील स्थान धोक्यात असल्याचे समजते...
कारण इंग्लंडविरुद्ध (England) उर्वरीत २ टी २० सामन्यांमधून त्याला भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचे तगडे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.
ऑस्ट्रेलियामधील वर्ल्डकपच्या तयारीसाठी भारतीय संघ सध्या टी २० मालिका खेळण्यावर अधिक भर देत आहे. आगामी विंडीज दौऱ्यासाठी विराटने विश्रांती घेतली आहे.
यासाठी त्याने बीसीसीआयला (BCCI) विनंती केली होती. निवड समिती वर्ल्डकप स्पर्धेसाठी टी २० फॉरमॅटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी २० फॉरमॅटमध्ये पहिली पसंती दिली जाणार आहे. त्यामुळे टी २० वर्ल्डकप संघात विराट कोहलीचे स्थान धोक्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सलिल परांजपे, नाशिक.