विराट कोहली IPL नंतर RCB चंही कर्णधारपद सोडणार

विराट कोहली IPL नंतर RCB चंही कर्णधारपद सोडणार

दिल्ली | Delhi

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ (IPL 2021) हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच एक मोठी बातमी समोर येत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली चालू आयपीएल हंगामानंतर कर्णधारपद सोडणार आहे (Virat Kohli to step down from RCB captaincy). आरसीबीने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे. (Virat Kohli to step down from RCB captaincy after IPL 2021)

"यंदाची आयपीएल स्पर्धा ही माझी संघाचा कर्णधार म्हणून माझी शेवटची स्पर्धा आहे. पण त्यानंतरही मी आरसीबीचा खेळाडू म्हणून मी खेळत राहणार आहे. माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत मी आरसीबीसाठी खेळत राहीन. आजवर माझ्यावर ठेवलेल्या विश्वास आणि मला दिलेल्या पाठिंब्याबाबत मी सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो", असं कोहलीनं म्हटलं आहे. कोहलीचा एक व्हिडिओ आरबीसीच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com