आयसीसी टी-२० क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप

आयसीसी टी-२० क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप

मुंबई | Mumbai

युएईत (UAE) नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या 'विराट' कामगिरीच्या जोरावर १४ स्थानांची झेप घेत अव्वल २० मध्ये दाखल झाला आहे...

आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) झालेल्या सामन्यात विराटने टी २० मधील आपले पहिले शतक ठोकून पुन्हा फॉर्ममध्ये असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तसेच आशिया चषकाच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने आशिया चषकाच्या ५ सामन्यांमध्ये २ अर्धशतक आणि १ शतक ठोकून २७६ धावा केल्या. त्यामुळे तो आयसीसी टी २० (ICC T20) फलंदाजांच्या क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे.

तसेच आशिया चषक स्पर्धेपूर्वी तो ३३ व्या क्रमांकावर होता. त्यानंतर आता विराटच्या खात्यात ५९९ गुण जमा झाले असून तो भारताचा कर्णधार रोहित शर्मापासून (Rohit Sharma) एक स्थान आणि ७ गुणांनी मागे आहे.विशेष म्हणजे कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल १५ मध्ये पोहोचला आहे.

दरम्यान, आयसीसी क्रमवारीत (ICC Rankings) रोहित शर्मा ६०६ गुणांसह १४ व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) ८१० गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एडम मार्करम (Adam Markram) दुसऱ्या स्थानावर आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com